Tuesday, March 20, 2007

तु कोठे जाणार?

माझ्या नज़रेत तुझं हसणं मला कळत नव्हतं
जेव्हा कळायला लागलं
तेव्हा ते हसणं मी गमवलं होतं
आता फ़क्त माझी नजर आहे...... एकटी,
कधी अश्रुंनी सजलेली तर कधी
अशीच शुन्य मनाने आकाशात
अगदी खिन्न झालेली

तुझ्या हसण्याने मी पुन्हा वेडी होणार;
हे केवळ आता स्वप्न झालं आहे
तुझ्या नजरेत माझं स्मित रमणार
हे आता फ़क्त मनाला समजवणारं
असत्याची साथ असलेलं खेळ आहे

माझ्या मनाशी तू हसलास, बोललास
इतकं जवळ येऊन जाणाऱ्या तुझ्या
मनाला जातांना एकदा तरी
माझी भिजलेली नजर,
माझं हरवलेलं स्मित आठवलं नाही?
तुला माझी साद ऐकू आली नाही?
की......आठवणी आणि साद तुलाच नको आहेत?
माझ्यापासून दुरावलास......पण
स्वतःला सोडून, स्वतः पासून दूर
तु कोठे जाणार?

2 comments:

Unknown said...

Dear Sonu,

You can write very well.Keep writing.
Waitnig for your many to come. Best luck. Luv Sheetu

Unknown said...

Dear Sonal,
Tuze Marathi kavya far avadale. CChhan lihites. Asech chalu thev.
krushna