Tuesday, March 20, 2007

तु कोठे जाणार?

माझ्या नज़रेत तुझं हसणं मला कळत नव्हतं
जेव्हा कळायला लागलं
तेव्हा ते हसणं मी गमवलं होतं
आता फ़क्त माझी नजर आहे...... एकटी,
कधी अश्रुंनी सजलेली तर कधी
अशीच शुन्य मनाने आकाशात
अगदी खिन्न झालेली

तुझ्या हसण्याने मी पुन्हा वेडी होणार;
हे केवळ आता स्वप्न झालं आहे
तुझ्या नजरेत माझं स्मित रमणार
हे आता फ़क्त मनाला समजवणारं
असत्याची साथ असलेलं खेळ आहे

माझ्या मनाशी तू हसलास, बोललास
इतकं जवळ येऊन जाणाऱ्या तुझ्या
मनाला जातांना एकदा तरी
माझी भिजलेली नजर,
माझं हरवलेलं स्मित आठवलं नाही?
तुला माझी साद ऐकू आली नाही?
की......आठवणी आणि साद तुलाच नको आहेत?
माझ्यापासून दुरावलास......पण
स्वतःला सोडून, स्वतः पासून दूर
तु कोठे जाणार?

Wednesday, March 14, 2007

मेंदी

हातात कुणाच्या रंगू लागली...... मेंदी
सुखाचा संदेश देऊ लागली ...... मेंदी
लावून घे मला तुझ्या हाती, आणी
जुळुन घे दुसऱ्यांशी नवीन नाती
माझा हा हिरवा रंग आहे तुझ्यासाठी
हाती लागून बदलावा थांबले त्या क्षणासाठी
माझा हा रंग रंगेल उद्या सकाळी
उद्या होशील पत्नी आज आहेस कुमारी
काही काळात माता देखिल होशील
तेव्हा ही तु नाही मला विसरशील
तुझ्या मुलीला मी हवीशी वाटणार सणात
त्यासाठी लावशील मेंदी तु अंगणात
परत परत तोच प्रसंग आहे घडणार
हाताची नवीन शोभा मी वाढवणार
मी आहे सुख आणी रसीकतेची प्रतीक
म्हणूनच सर्वांना हवीशी वाटते अधिक